नवी मुंबई : रबाळे एमआयडीसी परिसरात अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या व्यक्तीला आणि त्याला गांजा पुरविणाऱ्या महिलेला अंमली पदार्थविरोधी पथक (एएनसी) आणि रबाळे एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. रवींद्र विश्वकर्मा (४०) व कोमल राजपूत (४०) अशी या दोघांची नावे आहेत. पोलिसांनी या दोघांकडून ५२४ ग्रॅम गांजा, वजन काटा आणि रोख रकमेसह ६८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक संदीप निगडे (एएनसी) आणि रबाळे एमआयडीसी पोलिसांनी केली.





