राज्यात नाशिक येथे धर्मांतरणाचा गंभीर मुद्दा समोर आला आहे. या प्रकरणात दोषींवर कडक कारवाई करावी. अशी मागणीसाठी विश्व हिंदू परिषदेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.
विश्व हिंदू परिषदेच्या वतीने जिल्हा मंत्री अभिषेक कादी यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. या वेळी नाशिक येथे धर्मांतरण प्रकरण गंभीर आहे. या प्रकरणात पोलिसांनी संबंधितांना ताब्यात घेतले आहे. य
ा प्रकरणात आणखी काही जण सहभागी असल्याची भिती नाकारता येत नाही. या प्रकरणासह अन्य ठिकाणी होणारे धर्मांतरण प्रकरण रोखण्यासाठी संबंधितांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशीही मागणी या आंदोलनाद्वारे; तसेच निवेदनातून करण्यात आली आहे. या वेळी विश्व हिंदू परिषदेसह अन्य संघटनांचे पदाधिकारी यांची उपस्थिती होती.





