महाराष्ट्राच्या अमरावती जिल्ह्यात अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडीओ प्रसारित होत असल्याबद्दल राष्ट्रीय महिला आयोगाने चिंता व्यक्त केली आहे. अशा प्रकारचा मजकूर ऑनलाइन माध्यमांवरून काढून टाकण्याचे निर्देश आयोगाने प्रशासनाला दिले आहेत.
आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी आयोजित केलेल्या उच्चस्तरीय आढावा बैठकीमध्ये या प्रकरणातील तपासाच्या प्रगतीचा आढावा घेतला. सोशल मीडियावर मुलींचे अश्लील व्हिडीओ आणि छायाचित्रे प्रसारित केल्याप्रकरणी अमरावती पोलिसांनी आतापर्यंत आठ जणांना अटक केली आहे. ११ एप्रिलला काही संकेतस्थळांवर हे व्हिडीओ प्रसारित केल्याचे निदर्शनास आल्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला होता. या बैठकीला अमरावतीचे पोलिस आयुक्त राकेश ओला, जिल्हाधिकारी आशीष येरेकर, पोलिस अधीक्षक (ग्रामीण) विशाल आनंद आणि अतिरिक्त पोलिस अधीक्षक (अचलपूर) शुभम कुमार यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
नागपूरची पीडिता
देणार साक्ष...६
‘या प्रकरणाशी संबंधित सर्व माहिती शोधून ती हस्तगत करण्याचे प्रयत्न तीव्र करावेत. डिजिटल माध्यमांद्वारे होणाऱ्या संभाव्य व्यावसायिक शोषणामागे कोणताही आर्थिक पैलू आहे का, याची तपासणी करावी’, असे त्यांनी म्हटले. आरोपी आणि ज्या ठिकाणी कथित घटना घडल्या, त्या जागा यांच्यात संभाव्य दुवे आहेत का, याविषयीची सविस्तर माहितीही त्यांनी मागवली.








