नवी दिल्ली : बुद्धिबळातील दहा वर्षांखालील कॅडेट गटाची जगज्जेती ए. एस. श्रवणिका हिने फिडेच्या १२ वर्षांखालील गटाच्या जागतिक ‘रॅपिड’ स्पर्धेचे जेतेपद पटकावले. सर्बियातील व्रिन्याचकाह बान्या येथे सुरू असलेल्या या स्पर्धेच्या दोन फेऱ्या शिल्लक असतानाच श्रवणिका हिने जेतेपद निश्चित केले हे विशेष.
११ वर्षीय श्रवणिका हिने नवव्या फेरीत स्लोव्हेनियाच्या एमा जाकसा हिचा पराभव करत जेतेपद निश्चित केले. श्रवणिका हिने स्पर्धेत दहा विजय मिळवले असून एका फेरीत तिला युक्रेनची प्रतिस्पर्धी दारिया क्राव्हचुक हिच्याविरुद्ध बरोबरीत समाधान मानावे लागले होते.








