बाबासाहेबांनी धम्मचक्र गतिमान केले

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

नागपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५व्या जयंतीनिमित्त दीक्षाभूमी येथे प्रबोधन कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांनी बाबासाहेबांनी धम्मचक्र गतिमान केल्याचे सांगितले. बाबासाहेबांनी वंचित घटकांना मानसिक गुलामगिरीतून मुक्त केले. तामिळनाडूचे डॉ. डी. आर. एस. शेखर यांनी बाबासाहेबांनी संविधानाने देशाला एकसंघ ठेवल्याचे सांगितले.

बाबासाहेबांनी धम्मचक्र गतिमान केले

नागपूर : ‘मौर्य सम्राट अशोक यांच्यानंतर मानवमुक्तीचे प्रणेते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धम्मचक्र गतिमान केले’, असे प्रतिपादन दीक्षाभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष तथा धम्मसेना नायक भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांनी केले. संविधाननिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५व्या जयंतीनिमित्त दीक्षाभूमी येथे आयोजित प्रबोधन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ससाई बोलत होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून तामिळनाडूचे वैज्ञानिक आणि आंबेडकरी प्रबोधनकार डॉ. डी. आर. एस. शेखर, डॉ. आंबेडकर बुद्धिस्ट सेमिनरी (उंटखाना)चे मुख्य धम्म प्रशिक्षक भदंत धम्मसारथी, नालंदा अकादमीचे (वर्धा)चे संचालक अनुप कुमार आणि आकाश खोब्रागडे उपस्थित होते. ‘देशातील वंचित आणि पीडित घटकांना मानसिक गुलाम करून त्यांच्यावर अनेकांनी राज्य केले. परंतु, गुलामांना मुक्त करून त्यांच्या ह्रदयात राज्य करणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जगाच्या पाठीवर एकमेव आहेत’, असे सुरेई ससाई म्हणाले. अनुप कुमार म्हणाले, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची प्रेरणा घेऊन मोठ्या संघर्षाने नालंदा अकॅडमी सुरू केली. अनेक विद्यार्थी या अकॅडमीतून घडविले असून, या अकॅडमीला प्रत्येक पालकांनी मुलांसोबत भेट द्यावी.’ डी. एस. आर. शेखर म्हणाले, ‘भारतीय संविधानाच्या माध्यमातून देशाला एकसंघ ठेवण्याचे महान कार्य बाबासाहेबांनी केले.’ भदंत धम्म सारथी, आकाश खोब्रागडे यांनीही मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन भंते राहुल बोधी यांनी केले व आभार मानले.