अक्षय्य तृतीयेला उघडले बद्रीनाथजींचे पट

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

नागपूर येथील दोसर वैश्य चौकातील भगवान श्री बद्रीनाथ मंदिराचे पट अक्षय्य तृतीयेला भाविकांसाठी उघडण्यात आले. पहाटेपासून अभिषेक, पूजन आणि आरतीचा सोहळा पार पडला. या सोहळ्याला मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थिती लावली. श्री पोद्दारेश्वर राम मंदिराचे प्रबंध विश्वस्त पुनीत पोद्दार यांच्या हस्ते धर्मध्वजाचे पूजन झाले. भगवान श्री बद्रीविशाल यांचा अभिषेक आणि विशेष पूजा पंडीत उमेश तिवारी यांनी केली.

अक्षय्य तृतीयेला उघडले बद्रीनाथजींचे पट

नागपूर : अक्षय्य तृतीयेच्या पावन पर्वावर रविवारी सेंट्रल एव्हेन्यूवरील दोसर वैश्य चौकातील भगवान श्री बद्रीनाथ मंदिरात धार्मिक विधींनंतर मंदिराचे पट भाविकांसाठी खुले करण्यात आले. पहाटेपासूनच अभिषेक, पूजन आणि आरतीचा सोहळा झाला. या सोहळ्यात मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घेतला. श्री पोद्दारेश्वर राम मंदिराचे प्रबंध विश्वस्त पुनीत पोद्दार यांच्या हस्ते धर्मध्वजाचे पूजन करण्यात आले. भगवान श्री बद्रीविशाल यांचा अभिषेक आणि विशेष पूजा पंडीत उमेश तिवारी यांच्या हस्ते झाली. या सोहळ्याला मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष जयप्रकाश गुप्ता, समाजसेवी रामस्वरूप सारडा, नगरसेवक दीपक पटेल, नगरसेवक अतुल कोटेचा, अश्विनी गुप्ता, ब्रजभूषण शुक्ला, संतोष सिंग, गुरुदीपसिंग अरोरा, प्रदीप गुप्ता, रवींद्र कान्होरिया, नीरज गुप्ता, नगरसेविका प्रमिला गौर, माजी नगरसेवक मुन्नालाल गौर, रवी मिश्रा आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.