रोख रकमेसह बुलेट चोरीला

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

नागपूरच्या जुनी मंगळवारी परिसरात एका दुकानातून मोठी चोरी झाली. चोरट्याने दुकानाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. ड्रॉवरमधील ५० हजार रुपये रोख रक्कम आणि दुकानाबाहेर उभी असलेली बुलेट घेऊन तो पसार झाला. ही घटना शुक्रवारी रात्री घडली. सकाळी चोरी झाल्याचे लक्षात येताच पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

cash of 50 thousand and bullet stolen

नागपूर : जुनी मंगळवारी परिसरातील सिद्धेश्वर ट्रेडिंग धान्य दुकानातून ५० हजारांची रोख व समोर उभी असलेली बुलेट चोरी करण्यात आली. राजू रामेश्वर पौनिकर (वय ३५, रा. राखुंडेनगर, खरबी) यांच्या मालकीचे हे दुकान आहे. शुक्रवारी रात्री त्यांनी दुकान बंद केले. दुकानासमोरच एमएच ४९ एयू ५५६९ क्रमांकाची बुलेट ठेवली. ते कारने घरी गेले. मध्यरात्री संधी साधून दुकानाचा कडीकोयंडा तोडून चोरटा दुकानात घुसला. ड्रॉवरमधील ५० हजारांची रोख व बुलेट घेऊन चोरटा पसार झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी ही घटना समोर आली. याप्रकरणी राजू यांनी दिलेल्या तक्रारीवरून लकडगंज पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल करीत चोरट्याचा शोध सुरू केला आहे.