संवाद!

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

पक्षप्रमुख आणि सल्लागार यांच्यातील संवादातून राज्यातील राजकीय परिस्थितीवर प्रकाश टाकला आहे. सल्लागार पक्षातील आमदारांच्या संख्येबद्दल अनभिज्ञ आहेत. विरोधकांच्या मोर्चे आणि राहुल गांधींच्या भाषणाबद्दलही चर्चा होते. पक्षातील अंतर्गत घडामोडी आणि युवराजांना कार्याध्यक्ष करण्याच्या निर्णयावरही भाष्य केले आहे. सल्लागार आपल्या मोठ्या व्यापामुळे या चर्चेतून स्वतःला बाजूला ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत.

संवाद!

क्षप्रमुख : सल्लागार महोदय, राज्यात काय चाललं आहे याचा लेखाजोखा ठेवा आमच्यासमोर.

सल्लागार : महाराज, राज्यात सर्वत्र आलबेल आहे. आपले सर्व आमदार, खासदार शाबूत आहेत. देशात बरं चाललंय. आपल्यामुळेच विधेयक पडलं. आपण करून दाखवलं. त्यांना तोंड दाखवायला जागा राहिली नाही..

संवाद!

संवाद!

पक्षप्रमुख : काय सांगता? आपल्यामुळे पडलं? अहो, आपले खासदार किती?

सल्लागार (अचंबित होऊन) : महाराज, तुम्हाला आपले खासदार आठवत नाहीत?

पक्षप्रमुख : खामोश! उगाच वेगळा अर्थ काढू नका. त्यांना तोंड दाखवायला जागा नाही म्हणता; पण ते विरोधकांच्या नावाने मोर्चे काढताहेत...

सल्लागार : काढू द्या महाराज. काही होत नाही. मी दिल्लीत असतो. माझ्यावर विश्वास ठेवा. ते लवकरच जातील. परवाचं भाषण पाहिलं? त्यांनी ७८ वेळा काँग्रेसचं नाव घेतलं.

पक्षप्रमुख : तुम्ही मोजत होता का?

सल्लागार : महाराज, तुम्हाला माहीत आहे. मी सखोल अभ्यास केल्याशिवाय बोलत नाही. राहुलजींनी घातलेलं सोळाचं कोडं भन्नाट आहे. त्या कोड्यातच सगळं दडलं आहे. संपूर्ण भाजप कोडं सोडवीत बसली आहे!

पक्षप्रमुख : मग तुम्हाला एवढा हर्षवायू का झालाय? हल्ली तुमचं तिकडंच जास्त लक्ष असतं. तिथून वेळ मिळाला की मोठ्या साहेबांच्या पक्षात डोकं घालता. जरा आपलंही बघा ना.

सल्लागार : माफी असावी महाराज; पण मी हे सगळं आपल्या भल्यासाठीच करतो आहे.

पक्षप्रमुख : कसलं भलं? आपल्या महिला खासदाराने विधेयक पडल्याबद्दल अश्रू ढाळले. काय म्हणणं आहे त्यांचं?

सल्लागार : पुन्हा एकदा माफी महाराज; पण मला किरकोळ प्रश्नांत अडकवू नका. ज्याला जायचं असेल त्याने खुशाल जावं, असं तुम्हीच म्हणता ना?

पक्षप्रमुख (रागाने) : माझेच शब्द मला ऐकवू नका. आपल्या पक्षाचं कोण बघणार ते सांगा...

सल्लागार : रागावू नका महाराज. आपण युवराजांना कार्याध्यक्ष करतोय ना... ते बघतील. तुम्ही निश्चिंत राहा. आणि मलाही यात अडकवू नका! माझा व्याप मोठा आहे! - चकोर