ड्रग्जचा पुरवठादार कोण; शोध सुरू

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबईतील नेस्को सेंटरमध्ये झालेल्या ड्रग्ज मृत्यू प्रकरणात नवीन माहिती समोर आली आहे. अटक झालेले कॉलेज तरुण एका मोठ्या ड्रग्ज पुरवठादाराच्या संपर्कात होते. हा पुरवठादार सध्या फरार आहे. तरुणांनी पुरवठादाराच्या पत्नीच्या बँक खात्यावर पैसे पाठवले होते. या प्रकरणी तीन आरोपींची पोलीस कोठडी २३ एप्रिलपर्यंत वाढवण्यात आली आहे. बिस्मातसिंह भसीन आणि श्रेया राय या दोन विद्यार्थ्यांचा ड्रग्ज ओव्हरडोसने मृत्यू झाला होता.

mumbai drug death case search for big supplier underway

मुंबई : नेस्को सेंटरमधील दोन ड्रग्ज मृत्यू प्रकरणाच्या तपासामध्ये दिवसेंदिवस धक्कादायक माहिती समोर येत आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेले कॉलेज तरुण एका बड्या पार्टी ड्रग्ज पुरवठादाराच्या संपर्कात असल्याचे उघड झाले आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून हा पुरवठादार गायब आहे. या तरुणाने पुरवठादाराच्या पत्नीच्या बँक खात्यावर पैसे वळते केले आहेत. दरम्यान, अटक आरोपींपैकी आनंद पटेल, विनीत गेरेलानी आणि आयुष साहित्य या तिघांच्या पोलिस कोठडीत न्यायालयाने २३ एप्रिलपर्यंत वाढ केली आहे. गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये नेस्को आणि इन्स्पायरिंग टाय प्रोडक्शन यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जचा ओव्हरडोस झाल्याने बिस्मातसिंह भसीन आणि श्रेया राय या एमबीएच्या दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता.