सटाणा नगर परिषद निवडणुकीनंतर अवघ्या शंभर दिवसांत शहरासाठी सहा कोटी ७० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. नाशिक जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून नगराध्यक्षा हर्षदा पाटील यांनी हा निधी मंजूर करून आणला. या निधीमुळे शहरातील मूलभूत सुविधा अधिक सक्षम होणार असून, नागरिकांच्या दैनंदिन जीवनमानात सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
मंजूर निधीतून विविध विकासकामे केली जाणार असून, ही कामे मंजूर होण्यासाठी शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे, आमदार दिलीप बोरसे आणि आमदार सत्यजित तांबे यांच्या प्रयत्नांचा मोठा वाटा असल्याचे नगराध्यक्षा पाटील यांनी सांगितले.





