विणकरांच्या बँक खात्यात उत्सवभत्ता थेट जमा झाल्यामुळे भाजप विणकर प्रकोष्ठच्या पदाधिकारी आणि विणकरांनी शहरात ढोलताशांच्या गजरात पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला.
राज्यातील पात्र हातमाग विणकारांना महाराष्ट्र शासनाच्या एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण अंतर्गत सन २०२४ -२५ या वर्षातील गणेश चतुर्थीनिमित्त उत्सवभत्ता १३ एप्रिलपासून पुरुष व महिलांच्या बँक खात्यात अनुक्रमे १० हजार व १५ हजार रुपये जमा होत आहेत. या योजनेअंतर्गत दोन कोटी ७० लाख रुपये विणकरांच्या बँक खात्यात जमा होत आहेत. विणकरांनी आनंदोत्सव साजरा करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, मंत्री गिरीश महाजन, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री छगन भुजबळ, शिक्षक आमदार किशोर दराडे यांचे आभार मानले. यावेळी ढोलताशांच्या गजरात एकमेकांना पेढे भरवले. राज्याच्या वस्त्रोद्योग धोरण समिती सदस्य येवल्याचे भूमिपुत्र व भाजप विणकर प्रकोष्ठचे प्रदेश संयोजक मनोज दिवटे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.





