नव्या नियमाचा फायदा

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

रिझर्व्ह बँकेने क्रेडिट कार्ड पेमेंटवरील दंडात्मक शुल्काची गणना करण्याची पद्धत निश्चित केली आहे. आता अंतिम मुदत उलटून गेल्यानंतर भरायच्या रकमेवरच दंड आकारला जाईल. मासिक अहवालात संपूर्ण रक्कम बाकी दाखवता येणार नाही. यामुळे कार्डधारकांचा पतगुणांक घसरण्याची भीती कमी होईल. हा नवा नियम कार्डधारकांसाठी दिलासादायक ठरेल.

new rules reduce penalties on credit card payments

रिझर्व्ह बँकेने क्रेडिट कार्ड पेमेंटवर लावल्या जाणाऱ्या दंडात्मक शुल्काची मोजणी करण्याच्या पद्धतीचे प्रमाणीकरण केले आहे. त्यानुसार, क्रेडिट कार्ड देणाऱ्या वित्तसंस्थांना पेमेंटची अंतिम तारीख उलटून गेल्यावर जेवढी रक्कम भरायची बाकी राहिली आहे, त्यावरच दंड आकारता येईल. त्याचप्रमाणे या संस्थाना त्यांच्या मासिक अहवालात संपूर्ण रक्कम बाकी असल्याचे दाखवता येणार नाही. त्यामुळे कार्डधारकाचा पतगुणांक घसरण्याची भीती उरणार नाही.