भारतीय महिलांचा विजय

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

भारतीय महिला टेबल टेनिस संघाने युक्रेनवर रोमहर्षक ३-२ असा विजय मिळवला आहे. या विजयामुळे संघाने जागतिक अजिंक्यपद फायनल्सच्या पात्रता फेरीत आपले स्थान मजबूत केले आहे. मणिका बत्रा, दिया चितळे आणि यशस्वी घोरपडे यांनी महत्त्वपूर्ण विजय मिळवले. आता रवांडाविरुद्धचा सामना जिंकून मुख्य फेरीत प्रवेश करण्याची संधी आहे. हा सामना भारतीय संघासाठी निर्णायक ठरणार आहे.

historic victory of indian womens team against ukraine

लंडन : भारतीय महिला संघाने महत्त्वाच्या गट साखळी सामन्यात युक्रेनवर ३-२ असा रोमहर्षक विजय मिळवून जागतिक सांघिक अजिंक्यपद टेबल टेनिस फायनल्सच्या पात्रता फेरीतील आपली आशा जिवंत ठेवली आहे.

या विजयामुळे भारतीय संघ गट ६ मध्ये अव्वल स्थानी राहण्याच्या स्थितीत पोहोचला आहे. यात मणिका बत्राने तेत्याना बिलेन्कोविरुद्ध मात केली. मार्गारीटा पेसोट्स्काने यशस्वी घोरपडेवर मात केली. यानंतर दिया चितळेने वेरोनिका माट्युनिनावर विजय मिळवला. यानंतर मार्गारीटाने मणिका बत्राला नमवले. यशस्वीने तेत्यानाचा पराभव करून भारताचा विजय निश्चित केला. गुरुवारी भारताचा शेवटचा गट सामना रवांडाविरुद्ध होईल. ही लढत जिंकून भारतीय महिला संघाला मुख्य फेरीत दाखल होण्याची संधी आहे.