नवी दिल्ली : इंडियन बँकेने बुधवारी २०२५-२६ च्या चौथ्या तिमाहीत निव्वळ नफ्यात पाच टक्क्यांची वाढ नोंदवली असून, तो ३,१०३ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. थकीत कर्जांमधील घट हे या वाढीचे मुख्य कारण आहे. बँकेनेे गेल्या वर्षी याच कालावधीत २,९५६ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला होता. बँकेने २०२५-२६ या वर्षासाठी १० रुपये दर्शनी मूल्याच्या समभागावर प्रतिसमभाग १८.२५ रुपये लाभांश प्रस्तावित केला आहे.







