नवी दिल्ली : व्यावसायिक वाहने क्षेत्रातील दिग्गज कंपनी टाटा मोटर्स लिमिटेडने आर्थिक वर्ष २०२६ मध्ये १४४ पेटंट अर्ज दाखल केले आहेत. एका वर्षात कंपनीने केलेले हे आतापर्यंतचे सर्वाधिक पेटंट अर्ज आहेत. ही माहिती कंपनीने बुधवारी दिली.
वाहनांची वाढीव सुरक्षा, सुधारित विश्वासार्हता, मालकीचा एकूण खर्च कमी करणे आणि प्रवाशांना उत्कृष्ट आराम मिळवून देणे, वाहनचालन सुविधा यांसारख्या कंपनीच्या उद्दिष्टांशी हे पेटंट अर्ज सुसंगत असल्याचे ‘टाटा मोटर्स’ने निवेदनात म्हटले आहे.
‘आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये दाखल केलेल्या विक्रमी पेटंट अर्जांची संख्या ही कंपनीतील इंजिनीअरिंग टीमची जिद्द, सर्जनशीलता आणि तांत्रिक कौशल्याचा पुरावा आहे,’ असे गौरवोद्गार टाटा मोटर्सचे उपाध्यक्ष आणि इंजिनीअरिंग प्रमुख अनिरुद्ध कुलकर्णी यांनी काढले.
या वर्षात कंपनीने आपल्या पेटंट अर्जांव्यतिरिक्त २१ डिझाइन अर्ज आणि ३५ कॉपीराइट अर्ज दाखल केले आहेत.







