६४ कर्तृत्ववानांचा आज सत्कार

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
64 achievers honored today by minister chandrashekhar bavankule
नागपूर : आज, शनिवारी ८० व्या स्वातंत्र्यदिनी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते विभागीय आयुक्त कार्यालयात ध्वजारोहण करण्यात येईल. यावेळी जिल्ह्यातील विविध विभागांतील ६४ कर्तृत्ववानांचा सत्कार करण्यात येणार आहे, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. विभागीय आयुक्त कार्यालयात ध्वजारोहणाचा मुख्य कार्यक्रम होणार असल्याने सकाळी ८.३५ ते ९.३५ वाजेप्रयंत कोणताही शासकीय किंवा निमशासकीय कार्यक्रम आयोजित करू नये, अशा सूचना राज्य शासनाकडून देण्यात आल्या. राष्ट्रीय गीत वंदे मातरम् म्हटल्यानंतर राष्ट्रध्वजाला वंदन करताना राष्ट्रगीत म्हणण्यात यावे. त्यानंतर राज्यगीत म्हणण्यात येईल, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. कर्जमुक्ती झालेल्या चार शेतकऱ्यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वितरण करण्यात येणार आहे. यासह पोलिस, महसूल, कृषी विभागातील कर्मचाऱ्यांनाही गौरविण्यात येईल. शिक्षण विभागाने तयार केलेल्या ज्ञानरथ प्रयोगशाळेला हिरवी झेंडी दाखविण्यात येईल.