‘मोदी-पटेल असते तर फाळणी झाली नसती’

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
‘मोदी-पटेल असते तर फाळणी झाली नसती’
लखनौ : ‘देशाच्या फाळणीस काँग्रेसच जबाबदार असून, त्यावेळी नरेंद्र मोदी पंतप्रधान असते तर देश सुरक्षित राहिला असता,’ असे प्रतिपादन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शुक्रवारी एका कार्यक्रमात केले. ‘त्यावेळी सरदार वल्लभभाई पटेल पंतप्रधानपदी असते तरी कोणीही देशाचे तुकडे करू शकले नसते. पाकिस्तानची मागणी ज्यांनी केली होती, त्यांना न मागताही खूप काही देण्यात आले. सिंधसारखा हिंदूबहुल प्रांत किंवा हिंदू व शीख बहुसंख्य असणाऱ्या पंजाबचा एक भाग पाकिस्तानला देऊन टाकण्यात आला. बंगालच्या बाबतीतही हेच घडले. हा सर्व प्रकार काँग्रेसच्या कृपेने घडला,’ असेही ते म्हणाले.