गोवा महामार्गावर २० ठिकाणी धोका

Contributed byप्रसाद रानडे|महाराष्ट्र टाइम्स.कॉम
गोवा महामार्गावर २० ठिकाणी धोका
गणेशोत्सवासाठी गावी मोठ्या संख्येने कोकणवासी दाखल होणार असतानाच, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील २० अपघातप्रवण ठिकाणे (ब्लॅक स्पॉट) निश्चित करण्यात आली आहेत. रायगड जिल्ह्यात पळस्पे ते पोलादपूर या सुमारे १५० किलोमीटरच्या मार्गावर १७ अपघातप्रवण ठिकाणे असून, रत्नागिरी जिल्ह्यात खेड-भोस्ते आणि हातखंबा, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली-जाणवली परिसराचाही यात समावेश आहे.

गेली सुमारे १८ वर्षे मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू असतानाही या मार्गावरील धोकादायक ठिकाणांची समस्या कायम आहे. गणेशोत्सवाच्या काळात या महामार्गावर वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याने निश्चित करण्यात आलेल्या अपघातप्रवण ठिकाणांवर विशेष लक्ष देण्यात येणार आहे. या ठिकाणी कायमस्वरूपी उपाययोजना आणि आवश्यक दुरुस्ती तातडीने करण्याची मागणी वाहनचालक आणि प्रवाशांकडून होत आहे.
कोकणातील माणगाव-पुणे जोडणाऱ्या ताम्हिणी घाटातील ठिकाणाचा नव्याने अपघातप्रवण क्षेत्रात समावेश झाला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात मुंबई-गोवा महामार्गावरील खेड-भोस्ते आणि हातखंबा गाव या दोन ठिकाणांचाही यामध्ये समावेश आहे. याशिवाय रत्नागिरी-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्ग (पान ६वर)