मुंबईकरांंवर लवकरच करभार

Contributed byसुशांत मोरेsushant.more@timesofindia.com|महाराष्ट्र टाइम्स.कॉम
मुंबईकरांंवर लवकरच करभार
मुंबई : मुंबईत सुरू असलेली जवळपास दोन लाख कोटी रुपयांची कामे, घटत्या मुदत ठेवी आणि महापालिकेचा ८० हजार ९५२ कोटी रुपयांपर्यंत पोहोचलेला अर्थसंकल्प पाहता मुंबई महापालिका आर्थिक संकटातच सापडली आहे. त्यामुळे महसूलवाढीसाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. आर्थिक स्थिती सुधारणेसाठी महसूल वाढवा, असे स्पष्ट निर्देशच मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी संबंधित विभागांना दिले आहेत. परिणामी, मुंबईकरांवर लवकरच आर्थिक भार पडण्याची शक्यता आहे.

मुंबईची वाढती लोकसंख्या आणि घनकचऱ्याचे वाढते प्रमाण यामुळे कचरा व्यवस्थापनावरील खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. सुरळीत कामकाज आणि आर्थिक स्थैर्यासाठी घनकचरा व्यवस्थापन वापरकर्ता शुल्क लागू करण्याचे मुंबई महापालिकेने काही महिन्यांपूर्वीच प्रस्तावित केले. मात्र त्याला होणारा विरोध पाहता हा प्रस्ताव मागे पडला. सध्या मुंबईत घनकचरा व्यवस्थापनावर वर्षाला ३ हजार १४१ कोटी रुपये खर्च होत आहेत. अन्य शहरांच्या तुलनेत हा खर्च अधिक आहे. मुंबई महापालिकेने घनकचरा वापरकर्ता शुल्क आकारणी केल्यास केवळ रहिवासी इमारतींमधून वर्षाला ६८७ कोटी रुपये शुल्क मिळू शकेल. मुंबई महापालिका आयुक्तांनी महसूल वाढवण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन विभागालाही पत्र दिले असून या (पान ६वर)