‘लेक लाडकी’ अधिक सुलभ

महाराष्ट्र टाइम्स
‘लेक लाडकी’ अधिक सुलभ
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)
मुलींच्या सक्षमीकरणासाठी राबवण्यात येणाऱ्या ‘लेक लाडकी’ योजनेचा लाभ अधिकाधिक पात्र मुलींना मिळावा, यासाठी अर्ज प्रक्रिया सुलभ करण्यात आली आहे. लाभार्थी मुलींच्या पालकांना आता ‘आपले सरकार’ पोर्टलद्वारे थेट ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. अर्जासाठी आवश्यक कागदपत्रांची संख्याही कमी करण्यात येणार आहे. यामुळे अर्ज प्रक्रिया अधिक जलद आणि पारदर्शक होण्यास मदत होईल, अशी माहिती महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे यांनी दिली.

या योजनेसाठी १ एप्रिल २०२३पासून पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना १५ ऑगस्ट २०२७पर्यंत अर्ज करता येणार आहे. त्यानंतर पोर्टलवर नोंदणी होणाऱ्या नवीन प्रकरणांसाठी मुलीच्या जन्मानंतर एक वर्षाच्या आत अर्ज करणे आवश्यक राहणार (पान ६वर)