बलात्कारप्रकरणी तिघे अटकेत

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
rape of a 16 year old girl in mumbai three arrested
मुंबई : १६ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपावरून मुलुंड पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. तीन आरोपींपैकी एक जण अल्पवयीन असल्याचे पोलिसांनी सांगितले. थंड पेयामध्ये मादक पदार्थ मिसळून अत्याचार केल्याचा आरोप मुलीने केला आहे.

ही घटना ८ डिसेंबर, २०२५ रोजी घडली. सुमारे आठ महिन्यांनंतर १४ ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. वडिलांशी भांडण झाल्यानंतर मुलगी घरातून निघून गेली. घरामागील सायकल ट्रॅकच्या ठिकाणी तिला एक ओळखीची व्यक्ती भेटली. या व्यक्तीसोबत आणखी दोन तरुण होते. आरोपींनी तिला मादक पदार्थ असलेले शीतपेय दिले. त्यानंतर तिच्याकडून जबरदस्तीने गांजाचे सेवनही करवून घेतले. परिस्थितीचा फायदा घेऊन दोन आरोपींनी लैंगिक अत्याचार केला आणि तिसऱ्याने मदत केल्याचा आरोप मुलीने केला आहे.