‘ड्राय डे’ला २१ जण ताब्यात

महाराष्ट्र टाइम्स
on dry day during independence day police raided and detained 21 people
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात दारूविक्री आणि मद्यसेवनावर निर्बंध असताना मालाडच्या ओंकार सिग्नेट निवासी संकुलात आयोजित पार्टीवर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी २१ जणांना ताब्यात घेतले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून कुरार पोलिस तपास करीत आहेत.

ओंकार सिग्नेट निवासी संकुलात मद्यपान करून पार्टी केली जात असल्याची माहिती कुरार पोलिसांना मिळाली. डीजेच्या आवाजात सुरू असलेल्या पार्टीत पोलिसांनी छापा टाकला. या ठिकाणी पार्टी करीत असलेल्या २१ जाणांना ताब्यात घेण्यात आले. तसेच, परवानगीशिवाय डीजे लावणाऱ्यांनाही पकडण्यात आले. पोलिसांनी मद्यसाठ्यासह काही अमली पदार्थ, कंडोम आणि इतर आक्षेपार्ह वस्तू जप्त केल्याची माहिती आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.