Young Man Killed In Motorcycle Accident Sorrow Spreads In The Area
दुचाकी अपघातात तरुण ठार
Contributed by: मनमाड|महाराष्ट्र टाइम्स•
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)
येथील हुडको भागातील रहिवासी असलेल्या वीस वर्षीय तरुणाचा दुचाकीला अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्री घडली. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे. यश रोडगे असे मृत तरुणाचे नाव आहे.
देवळा परिसरात कार्यरत असणारा यश देवळा-चांदवड मार्गावरून दुचाकीने जात असताना अज्ञात वाहन ाने त्याच्या दुचाकीला धडक दिल्याने तो जागीच ठार झाला. या घटनेने हुडको परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अपघातास कारणीभूत अज्ञात वाहन चालकावर कारवाई करण्याची मागणी नातेवाईक व मित्र परिवाराने केली आहे. यश अविवाहित असून, त्याच्या मागे आई, वडील, तीन बहिणी असा परिवार आहे. रविवारी दुपारी मनमाड येथे त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.