Assault On Doctor Vinit Deshmukh Attacks In Kalyan
कल्याणमध्ये डॉक्टरला मारहाण
महाराष्ट्र टाइम्स•
डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात ड्युटीवर असलेल्या दोन डॉक्टरांना नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी मारहाण केल्याची घटना ताजी असतानाच कल्याण मध्येही डॉक्टरवर हल्ल्याची घटना घडली आहे. कल्याण पूर्वेतील एका खासगी रुग्णालयात शनिवारी रात्री रुग्णाच्या नातेवाईकाने डॉ. योगेंद्र जयस्वाल यांना मारहाण केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी डॉक्टरच्या तक्रारीवरून कोळसेवाडी पोलिसांनी विनीत देशमुख यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
विनीत देशमुख हे त्यांचे वडील जयवंत देशमुख यांना उपचारासाठी रुग्णालयात घेऊन गेले होते. जयवंत देशमुख यांच्या बरगड्यांना दुखापत झाल्याने डॉ. जयस्वाल यांनी त्यांची तपासणी करून औषधे दिली. औषधांचे डोस समजावून सांगत असताना विनीत देशमुख यांनी डॉक्टरांना आजाराच्या तीव्रतेबाबत वारंवार प्रश्न विचारले. डॉक्टरांनी माहिती दिल्यानंतरही विनीत देशमुख यांचे समाधान झाले नाही. तेच प्रश्न पुन्हा पुन्हा (पान ६वर)