आंदोलनांदरम्यान संयम बाळगा

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
आंदोलनांदरम्यान संयम बाळगा
आंदोलनांदरम्यान पोलिस कर्मचाऱ्यांनी संयम राखावा, चिथावणीला बळी पडू नये आणि आंदोलकांकडून मोबाइल चित्रीकरणाद्वारे दलाची प्रतिमा मलिन होईल अशी कोणतीही कृती टाळावी, अशा नव्या मार्गदर्शक सूचना दिल्ली पोलिसांना केंद्रीय यंत्रणेने जारी केल्या आहेत, अशी माहिती पोलिस सूत्रांनी रविवारी दिली.

गेल्या महिन्यात जंतरमंतर येथे कॉक्रोच जनता पार्टीच्या (सीजेपी) आंदोलनावेळी पोलिसांकडून अतिरेक झाल्याचे आरोप झाले होते. त्या पार्श्वभूमीवर या सूचना देण्यात आल्या आहेत. ‘तुमचा राग हीच त्यांची समाधानाची बाब आणि तुम्हाला खलनायक म्हणून दाखवण्यासाठीची सामग्री (पान ६वर)