‘यूजीसी नेट’ची तात्पुरती उत्तरतालिका प्रसिद्ध

महाराष्ट्र टाइम्स
ugc net provisional answer key released last date for submitting objections is august 18
राष्ट्रीय पात्रता परीक्षेच्या २०२६ परीक्षेची तात्पुरती उत्तरतालिका जाहीर झाली आहे.

२२ ते ३० जूनदरम्यान झालेल्या ८४ विषयांच्या परीक्षेच्या उत्तरतालिकेवर उमेदवारांना १८ ऑगस्टपर्यंत हरकती नोंदवता येतील. प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराला आव्हान देण्यासाठी २०० रुपये शुल्क आकारले जाणार आहे.
उमेदवारांना उत्तरतालिकेसोबत त्यांनी नोंदवलेल्या उत्तरांची पाहणी करून संबंधित प्रश्नाच्या उत्तरावर ऑनलाइन हरकत नोंदवता येईल. ही प्रक्रिया १६ ऑगस्टपासून सुरू झाली असून, १८ ऑगस्ट रोजी रात्री ११.५९ वाजता बंद होईल. हरकत नोंदवताना डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंगद्वारे शुल्क भरावे लागेल.

इंग्रजी, वाणिज्य आणि समाजशास्त्र या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिकांबाबत प्राप्त तक्रारींची पडताळणी करण्यासाठी स्वतंत्र समिती स्थापन करण्यात आली आहे. या विषयांसंदर्भातील स्वतंत्र सूचना नंतर जाहीर केल्या जातील, असे एनटीएने स्पष्ट केले आहे. अद्ययावत माहितीसाठी उमेदवारांनी एनटीएचे https://www.nta.ac.in/ आणि यूजीसी नेटचे https://ugcnet.nta.nic.in/ हे संकेतस्थळ पाहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.