Clerk Kisan Patil Caught Red handed Accepting Bribe In Srinagar School
लाचप्रकरणी लिपिकास अटक
महाराष्ट्र टाइम्स•
श्रीनगर विद्यामंदिर शाळेतील वरिष्ठ लिपिक किसन पाटील याला लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केली आहे.
तक्रारदार गेल्या वर्षी ३० एप्रिल रोजी निवृत्त झाले होते. त्यांच्याकडे पाटीलने २०२५-२०२६ या आर्थिक वर्षातील फॉर्म १६ देण्यासाठी ६ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. याबाबत तक्रार आल्यानंतर एसीबीच्या पोलिस निरीक्षक अनुपमा खरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.