‘संविधानातील अधिकार’ पुस्तकाचे आज प्रकाशन

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
constitutional rights book launch ceremony in nagpur
नागपूर : ॲड. सुधाकर भोले लिखित ‘संविधानातील मूलभूत अधिकार , मानवाधिकार आणि माहितीचा अधिकार’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा शनिवार, २२ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजता सक्करदरा येथील संताजी सांस्कृतिक सभागृहात होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती आणि महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, नागपूरचे माजी उपाध्यक्ष मुरलीधर गिरटकर अध्यक्षस्थानी राहतील. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील. आमदार ॲड. अभिजित वंजारी, साहाय्यक पोलिस आयुक्त नरेंद्र हिवरे, आंतरराष्ट्रीय ह्युमन राइट्स असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष विलास कांबळे आणि तेली समाज सभेचे अध्यक्ष ॲड. नरेंद्र ढगे उपस्थित राहतील. सोहळ्यादरम्यान संगीताचा कार्यक्रम होईल. सूत्रसंचालन अनिल फुलझेले करतील. उपस्थित राहावे, असे आवाहन ॲड. सुधाकर भोले आणि रत्ना भोले यांनी केले आहे.