प्रकल्पाच्या कामाचा वेग वाढवण्यासाठी सतत धावणाऱ्या एसटी बसचा अडथळा येत असल्याचे सांगत, रेल्वे स्थानक परिसरात येणाऱ्या एसटी बसना स्थानकात येण्यास बंदी घालण्यात आली. यामुळे एसटी प्रवाशांना सामानासह अर्ध्या रस्त्यात उतरावे लागते. परिणामी प्रवाशांचे हाल होत आहेत. मात्र, प्रवाशांना होणाऱ्या त्रासाशी प्रशासनाला देणेघेणे नाही.