शुल्क भरूनही सेवा अपुऱ्या

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
entrepreneurs complain about inadequate services despite fees collected by midc
‘एमआयडीसी’कडून विविध शुल्कांच्या माध्यमातून उद्योगांकडून मोठ्या प्रमाणात रक्कम वसूल केली जाते. उद्योजकांनी जानेवारी २०२३ ते जानेवारी २०२४ या कालावधीत अग्निशमन शुल्कापोटी ६७ लाख ८६ हजार १४२ रुपये जमा केले. एप्रिल २०२५ ते मार्च २०२६ या कालावधीत पर्यावरण शुल्कापोटी ८ कोटी ६२ लाख ६९ हजार १०४ रुपये, तर डिसेंबर २०२५ ते मे २०२६ या कालावधीत ‘सीईटीपी’ शुल्कापोटी २ कोटी २५ लाख ६५ हजार ४२१ रुपये जमा करण्यात आले आहेत. मात्र, या मोठ्या रकमांच्या तुलनेत पायाभूत सुविधा आणि देखभाल-दुरुस्तीच्या सेवा मिळत नसल्याची उद्योजकांची तक्रार आहे.