वसतिगृहांसाठी प्रवेश सुरू

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
hostel admission process started for other backward classes
छत्रपती संभाजीनगर : इतर मागासवर्ग , विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृहांमध्ये प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे.

विद्यार्थ्यांना ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार आहे. एक ते सात सप्टेंबर दरम्यान अर्जांची छाननी करण्यात येणार आहे. त्यानंतर पहिली निवड यादी आठ सप्टेंबर रोजी जाहीर होईल. निवड यादीतील विद्यार्थ्यांना १८ सप्टेंबरपर्यंत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे. त्यानंतर रिक्त जागांसाठी प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांमधून गुणवत्तेनुसार दुसरी निवड यादी २१ सप्टेंबर रोजी जाहीर होईल. दुसऱ्या निवड यादीतील विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाची अंतिम मुदत ३० सप्टेंबरपर्यंत आहे. उच्च शिक्षणातील व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या पात्र विद्यार्थ्यांनी अर्ज करावेत, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाने सहायक संचालक दयानंद कोकरे यांनी केले.