दहा नगरसेवक भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
ten municipal councilors join bjp strengthening party numbers
छत्रपती संभाजीनगर : कळंब (जि. धाराशिव) नगरपालिकेतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नऊ व काँग्रेसचा एक अशा दहा नगरसेवकांनी नुकताच भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.

सोलापूर येथे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश केला. आमदार राणाजगतिसिंह पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करून हा निर्णय घेतल्याचे पक्षप्रवेश केलेल्या नगरसेवकांनी सांगितले. कळंब शहरातील रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य यासारख्या प्रश्नांवर केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून अधिकाधिक निधी उपलब्ध करून घेण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कळंब नगरपालिकेत भाजपचे यापूर्वी सहा सदस्य हते. आता दहा जणांच्या पक्षप्रवेशामुळे संख्याबळ १६ वर पोचले आहे.