छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ विद्यार्थी विकास विभागातर्फे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांचा जन्मदिवस जलसंधारण दिन म्हणून साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने विद्यापीठात कमवा आणि शिका विभागामध्ये विद्यार्थ्यांनी मृदा व जलसंधारणाची शपथ घेतली.
या वेळी डॉ. कैलास अंभुरे, गजानन पालकर, गौतम सोनवणे यांच्यासह ३०० विद्यार्थी उपस्थित होते. पर्यावरणशास्त्र विभागातही शपथ घेतली. प्रा. बलभीम चव्हाण यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.