‘दडपशाही नाकारा’

महाराष्ट्र टाइम्स
‘दडपशाही नाकारा’
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)
‘मुलगी किंवा स्त्री कायम पिंजऱ्यात बंदिस्त आणि आपल्या नियंत्रणातच असली पाहिजे; मुलांना मात्र स्वातंत्र्य असले पाहिजे, ही मनुस्मृतीची दडपशाहीची मानसिकता आहे. असा हिंदुस्तान आपल्याला नको’, असे स्पष्ट करून लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शनिवारी महिलांना पितृसत्ताक मानसिकता उखडून टाकण्याचे आवाहन केले. ‘आपल्याला न्याय, सर्वांचा आदर-सन्मान हवा असून, मुलींच्या मनातील भीती कायमस्वरूपी संपुष्टात यायला हवी’, असेही ते म्हणाले.

‘एसएसपीएमएस’च्या मैदानावर आयोजित देशातील चौथ्या ‘छात्रों की गूँज’ कार्यक्रमात ते बोलत होते. पेपरफुटीविरोधात देशभरातील विद्यार्थ्यांनी जंतरमंतर येथे केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात विद्यार्थिनींसाठी हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला हजारो युवतींनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.
‘सुमारे ७० कोटी महिला ही भारताची शक्ती असून, त्या देशाचा पाया आणि भविष्यही आहेत. दडपशाहीची पितृसत्ताक मानसिकता त्यांना धमकावते, घाबरवते. आपण सर्वांनी एकजुटीने ही पितृसत्ताक मानसिकता संपवू, उखडून टाकू. त्यासाठी तुम्ही निडरपणे व्यक्त व्हा, स्वाभिमान बाळगा आणि समाजात स्वतःच्या स्थानासाठी लढा’, असा सल्ला राहुल यांनी युवतींना दिला.

‘जंतरमंतरवर आंदोलन करताना मुलांनी आणि मुलींनीही अपशब्द वापरले. मुलींनी शिवीगाळ करणे हा सांस्कृतिक धक्का होता, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. त्यांना मुलांनी शिवीगाळ करणे मान्य आहे; पण मुलींनी शिव्या दिल्या, तर तो सांस्कृतिक धक्का असतो. मोहन भागवत म्हणतात की, इंडियात बलात्कार होतात, भारतात होत नाहीत. ‘८० टक्के बलात्कार महिलांमुळेच होतात’, असे मनोहरलाल खट्टर म्हणतात. या मानसिकतेविरोधातच आपल्याला लढायचे आहे’, असे राहुल गांधी म्हणाले.तरुणींचा उत्स्फूर्त

प्रतिसाद...१२