सर्दी आणि ॲलर्जी यासाठी वापरल्या जाणाऱ्या क्लोरफेनिरामाइन मॅलेट आणि फेनिलेफ्राइन हायड्रोक्लोराइड या औषधांच्या सर्व फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन्सच्या (एफडीसी) निर्मिती, विक्री आणि वितरणावर सरकारने निर्बंध घातले आहेत. ही औषधे चार वर्षांखालील मुलांना देऊ नयेत, असा स्पष्ट इशारा देणे बंधनकारक करण्यात आले आहे.
लहान मुलांच्या आरोग्य आणि सुरक्षिततेचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने हे पाऊल उचलण्यात आल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. यापूर्वी १५ एप्रिल, २०२५ रोजीच्या अधिसूचनेद्वारे सरकारने या दोन (पान १२वर)