Stark Stuns Bangladeshi Batsmen Shariful Provides Strong Response
स्टार्कच्या तुफानासशरीफुलचे प्रत्युत्तर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
मिचेल स्टार्कने बांगलादेश चा सलामीवीर शादमान इस्लाम याला पहिल्याच चेंडूवर बाद केले. या धक्क्यातून बांगलादेश सावरण्यापूर्वीच त्यांचा पहिला डाव स्टार्कच्या भेदकतेसमोर ६४ धावांत आटोपला होता; मात्र शरीफुल इस्लामने चांगले प्रत्युत्तर दिले. त्यानेही अर्धा डझन फलंदाज बाद केले. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला पहिल्या दिवसअखेर ८ बाद १६५ या धावसंख्येवर समाधान मानावे लागले.
पहिल्या दिवशी नाणेफेकीच्या वेळी खेळपट्टीतील दवाचा फायदा घेण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे कमिन्सने सांगितले. पहिल्या दिवशी १८ फलंदाज बाद झाले. अखेरच्या सत्रातही फलंदाजी सोपी नव्हती. त्यामुळे पहिल्या दिवसअखेर १०१ धावांच्या आघाडीवर कांगारुंना समाधान मानावे लागले. कॅमेरुन ग्रीनच्या नाबाद अर्धशतकामुळेच हे शक्य झाले आहे.स्टार्कने चौथ्यांदा पहिल्या चेंडूवर विकेट घेतली. त्यानंतर तिसऱ्या षटकांत दोघांना बाद केले. स्टार्कने हा धडाका कायम ठेवताना १२ धावांत सहा जणांना टिपले. त्याला कमिन्सच्या तीन विकेटची साथ लाभली. त्यामुळे १९३२पासूनच्या नीचांकास बांगलादेशाला सामोरे जावे लागले. शोरीफुलने ३२ धावांत सहा विकेट घेतल्या आहेत; पण त्याला सहकाऱ्यांची पुरेशी साथ लाभली नाही.सं
संक्षिप्त धावफलक : बांगलादेश : पहिला डाव - ३४ षटकांत ६४ (मोमीनुल हसन ९, मेहिदी हसन मिराझ ११, हसन महमूद १०, तैजुल इस्लाम नाबाद ११, शरीफुल इस्लाम १४, मिचेल स्टार्क १०-६-१२-६, जोश हेझलवूड ११-१-१८-१, पॅट कमिन्स १०-४-२५-३) वि. ऑस्ट्रेलिया : पहिला डाव - ४० षटकांत ८ बाद १६५ (ट्रॅव्हिस हेड २२, स्टीव्ह स्मिथ ४२, कॅमेरुन ग्रीन खेळत आहे ५१, नॅथन लायन खेळत आहे १०, शरीफुल इस्लाम ११-२-३५-६).