Unsafe And Adulterated Food Issues At St Bus Stops
एसटीचा थांबा, आरोग्याला धोका
Contributed by: वैभव भोळे|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
अन्न व औषध प्रशासनाकडून राज्यभरात निकृष्ट, भेसळयुक्त आणि असुरक्षित अन्नाविरोधात मोहीम सुरू असतानाच मुंबई-गोवा महामार्गावरील एसटी बसच्या अधिकृत थांब्यांवरील काही हॉटेल आणि धाब्यांमध्ये प्रवाशांना निकृष्ट, शिळे अन्न दिले जात असल्याच्या तक्रारी पुढे आल्या आहेत. कोकणातील गणेशोत्सव तोंडावर आला असताना हजारो प्रवाशांच्या आरोग्याशी संबंधित या मुद्द्याकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
एसटीच्या अधिकृत थांब्यांवरील हॉटेलांचा प्रश्न अधिक गंभीर मानला जात आहे. बस थांबल्यानंतर प्रवाशांकडे जेवणासाठी साधारण १५ मिनिटांचा अवधी असतो. या अल्प वेळेत जेवण उरकून बसमध्ये परतण्याची घाई असल्याने अन्नाचा दर्जा निकृष्ट असल्याचे लक्षात आले, तरी हॉटेलचालकाशी वाद घालणे, दुसरे अन्न मागणे किंवा तक्रार करणे प्रवाशांना शक्य होत नाही. त्यामुळे प्रवाशांकडे तक्रार करण्यासाठी वेळच नसेल, तर तपासणी कोण करणार?, असा प्रश्न उपस्थित होत आहे.महामार्गावरील काही हॉटेलांमध्ये शिळ्या पदार्थांना पुन्हा फोडणी देऊन ते ताजे असल्याचा भास निर्माण केला जात असल्याच्या तक्रारी आहेत. अन्न किती वेळापूर्वी तयार (पान १२वर)