तळोजा ‘एमआयडीसी’तील पायाभूत सुविधा, वाहतूक कोंडी, पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन, पथदिवे आणि सुरक्षेसह विविध प्रश्नांमुळे येथील उद्योजक त्रस्त झाले आहेत. या समस्यांचा थेट परिणाम उद्योगांच्या दैनंदिन कामकाजावर आणि उत्पन्नावर होत असल्याचा दावा उद्योजकांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर तळोजा मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन आणि तळोजा इंडस्ट्रीज असोसिएशनने ‘एमआयडीसी’ प्रशासन तसेच उद्योगमंत्र्यांकडे वारंवार पाठपुरावा सुरू ठेवला आहे.
तळोजा ‘एमआयडीसी’तील १६ मूलभूत समस्या मांडणारी अनेक पत्रे ‘एमआयडीसी’च्या तळोजा उपविभागीय कार्यालयाला देण्यात आली आहेत. ‘एमआयडीसी’ची कार्यप्रणाली सुरळीत राहावी, यासाठी या प्रश्नांकडे प्राधान्याने लक्ष देण्याची मागणी उद्योजकांनी केली आहे. तळोजा ‘एमआयडीसी’चा समावेश प्रस्तावित औद्योगिक टाउनशिपच्या यादीत करण्यात आला असला, तरी त्याची अंमलबजावणी अद्याप प्रलंबित आहे. औद्योगिक(पान १०वर)