‘ग्रामविकासाच्या वारी’ला प्रतिसाद

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
citizens issues addressed in the village development initiative
सिल्लोड : ‘ग्रामविकासाची वारी, सभापती जनतेच्या दारी’ या उपक्रमाला केळगाव येथून सुरुवात करण्यात आली. या उपक्रमात केळगाव,पिंपळगाव घाट, सिरसाळा, सिरसाळा तांडा येथे सभापती अनिता सुरेश बनकर व उपसभापती भगवान आहेर पंचायत समिती सदस्या यांनी भेटी देऊन अडचणी समस्या समस्या जाणून घेतल्या.

गावागावातील विकासकामांचा आढावा घेणे, विविध शासकीय योजनांचा अंमलबजावणी आढावा घेण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. सभापती अनिता बनकर व उपसभापती भगवान आहेर सदस्या तुळसाबाई कोठाळे यांनी नागरिकांच्या समस्या भेटी घेत अडचणी जाणून घेतल्या. तर नागरिकांच्या समस्या जाणून घेत अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाहीच्या सूचना दिल्या.
या वेळी प्रधानमंत्री आवास योजना व घरकुल, सिंचन विहिरी, शेतीविषयक योजना, पाणीपुरवठा, रस्ते; तसेच ग्रामविकासाच्या विविध योजनांबाबत नागरिकांशी चर्चा करण्यात आली.