Collapse Of 70 year old Nikam House At Harinivas Chowk No Casualties
७० वर्षे जुन्या इमारतीची पडझड
महाराष्ट्र टाइम्स•
हरिनिवास चौक येथे असलेल्या ७० वर्षे जुन्या ‘निकम हाऊस’ या तळमजला अधिक एक मजली इमारतीच्या सज्जाचा भाग रविवारी दुपारी कोसळला. या दुर्घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही.
‘निकम हाऊस’ या इमारतीच्या बाहेरील बाजूस असलेल्या सज्जाचा काही भाग पडला. या इमारतीचे अनेक ठिकाणी प्लास्टर पडलेले निदर्शनास आले असून, उर्वरित इमारतही अत्यंत धोकादायक स्थितीत आहे. घटनेची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी इमारतीमध्ये राहणाऱ्या कुटुंबीयांना सुरक्षेच्या दृष्टिकोनातून या इमारतीमध्ये न राहण्याच्या सूचना दिल्या.