गॅरेजचालक रस्त्यावर तसेच पदपथांवर वाहनांची दुरुस्ती करत करतात. दुरुस्तीसाठी आलेली वाहने रस्त्यावरच उभी असतात. तसेच, दुरुस्तीचे सामान रस्त्यावर पडलेले असल्याने वाहने आणि या सामानातून वाट काढत जाताना पादचाऱ्यांना मोठी कसरत करावी लागते.