Congress Questions Amit Shah On Constituency Reorganization
मतदारसंघ फेररचनेवरून काँग्रेसचा शहा यांना प्रश्न
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे विशेष अधिवेशनात मतदारसंघांच्या फेररचनेशी संबंधित घटनादुरुस्ती विधेयक मंजूर करून घेण्यासाठी अजूनही दोन-तृतीयंश बहुमताच्या शोधात आहेत का, असा प्रश्न काँग्रेसने संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या सत्रसमाप्तीस होत असलेल्या विलंबावरून उपस्थित केला. ‘लोकसभेचे सभागृह अनिश्चित काळासाठी तहकूब होऊन १० दिवस उलटले आहेत. मात्र, अद्यापही सत्र समाप्त झाल्याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही’, असे पक्षाचे सरचिटणीस (प्रसारमाध्यम विभाग प्रभारी) जयराम रमेश यांनी नमूद केले.