Deteriorating Situation Of Cluster Company Opposition In Thane
क्लस्टर कंपनी विरोधाचा प्रश्न चिघळला
महाराष्ट्र टाइम्स•
क्लस्टर पुनर्विकास राबविण्यासाठी ठाण्यात कंपनी स्थापन करण्याचा प्रस्ताव महासभेत मंजूर करण्यात आला आहे. सत्ताधाऱ्यांच्या या प्रस्तावाच्या विरोधात पालिकेतील विरोधक चांगलेच आक्रमक झाले असून, या विरोधातील मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारल्याने वाद आणखी चिघळला आहे.
ठाणे शहरात क्लस्टर योजना राबविण्यासाठी ‘क्लस्टर विकास कंपनी’ला ठाणे पालिकेकडून सर्वाधिकार देण्यात आले आहेत, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने केला आहे. या विरोधात पक्षाने येत्या २७ ऑगस्टला क्लस्टर कंपनीच्या कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली आहे, असा आरोप पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी पत्रकार परिषदेत केला. या प्रसंगी माजी नगरसेवक मिलिंद बनकर, युवकचे कार्याध्यक्ष राजेश कदम, सचिन पंधरे उपस्थित होते.
‘असा कोणता साप?’
‘असा कोणता साप आहे की, ज्याच्या शेपटीवर आम्ही पाय दिला म्हणून परवानगी नाकारण्यात आली,’ असा प्रश्न उपस्थित करत, आम्ही मोर्चा काढण्यावर ठाम असल्याचे प्रधान यांनी सांगितले.