एकीकडे मुंबईतील विविध पथकांची दहा थरांसाठी एकमेकांमध्ये स्पर्धा रंगलेली असताना, आता ठाण्यातही नऊ आणि दहा थरांसाठी गोविंदा पथकांचा प्रयत्न सुरू असल्याचे या निमित्ताने दिसून आले. ‘सीपी तलावचा राजा’ पथकाचे प्रशिक्षक आकाश सकपाळ व अध्यक्ष आनंद पाटकर यांच्यासह या पथकाच्या संपूर्ण चमूच्या मेहनतीचे हे फळ असल्याचे या वेळी सांगण्यात आले. तसेच, गेल्या वर्षी ‘ठाण्याचा राजा’ गोविंदा पथकाने विविध दहीहंडी उत्सवांमध्ये नऊ थरांची यशस्वी उभारणी केली होती. मात्र, यंदा ज्या ठिकाणी पथकाचा सराव होतो, त्या ठिकाणी नऊ थरांचा मनोरा रचून जल्लोष साजरा केला.