संकटात नि:स्वार्थ मदत

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
selfless help by sherpa in crisis
माउंट एल्ब्रुसवरील बचाव मोहीमही शेर्पाच्या धाडसाची साक्ष देणारी ठरली. उतरताना प्रकृती गंभीर झालेल्या एका भारतीय डॉक्टरला ऑक्सिजनअभावी हायपोक्सियाचा त्रास झाला होता. सहकाऱ्यांच्या मदतीने तब्बल चार तास बचावकार्य करून त्यांना सुरक्षित तळावर आणण्यात आले. मदतीच्या बदल्यात पैशांची ऑफर मिळाली; मात्र ती त्याने नाकारली. संकटात सापडलेल्या व्यक्तीला नि:स्वार्थपणे मदत करणे हीच शेर्पा संस्कृतीची खरी ओळख असल्याचे त्याने सांगितले.