The Craze For Smart Rakhis And The Increase In Digital Purchasing For Raksha Bandhan
रक्षाबंधनाला ‘डिजिटल’ खरेदी
महाराष्ट्र टाइम्स•
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)
रक्षाबंधनाचा सण अवघ्या काही दिवसांवर आल्याने ठाणे जिल्ह्यात राखी खरेदीला वेग आला आहे. मात्र, यंदा ‘स्मार्ट राखी’ची तरुणाईमध्ये विशेष क्रेझ पाहायला मिळत आहे. ठाणे, कल्याण, डोंबिवली परिसरात जेन-झी आणि मिलेनिअल्सकडून डिजिटल सुविधा असलेल्या राख्यांना पसंती दिली जात आहे.
यंदाच्या बाजारातील आकर्षण ठरत आहे ती ‘एनएफसी एव्हिल आय’ स्मार्ट राखी. राखीच्या मागील बाजूस स्मार्टफोन टॅप केल्यानंतर थेट एक पर्सनलाइज्ड डिजिटल मेमरी पेज उघडते. त्यावर बहिणीला भावासाठी खास फोटो, व्हिडिओ आणि भावनिक संदेश पाठवता येतो. त्यामुळे राखी केवळ शुभेच्छांचे प्रतीक न राहता भावंडांच्या आठवणींचे डिजिटल माध्यम बनत आहे. तर लहान मुलांसाठी सुपरहिरो चार्म असलेल्या राख्यांचीही मागणी वाढली आहे. ‘आयर्न मॅन’सह विविध सुपरहिरोंच्या डिझाइनमधील रंगीबेरंगी राख्या बालचमूंचे लक्ष वेधून घेत आहेत. शेवटच्या क्षणी खरेदी
धावपळीच्या जीवनशैलीमुळे क्विक कॉमर्सकडेही ग्राहकांचा कल वाढला आहे. राम मारुती रोड, गोखले रोड, जांभळी नाका यांसारख्या बाजारपेठेत जाण्याऐवजी ऑनलाइन ऑर्डरला प्राधान्य देत आहेत.