Abhay Singh Clinches The Tuanku Muhriz Cup Squash Tournament
स्क्वॉशपटू अभयनेपटकावले जेतेपद
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
नवी दिल्ली : अव्वल मानांकित अभय सिंगने रविवारी मलेशियातील नेगेरी सेम्बिलान येथे पार पडलेल्या १५ हजार अमेरिकन डॉलर बक्षीस रकमेच्या ‘ तुआंकू मुहरीझ करंडक ’ स्क्वॉश स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात त्याने हाँगकाँगच्या तिसऱ्या मानांकित हेन्री लेउंगचा पाच गेम चाललेल्या अटीतटीच्या लढतीत पराभव केला. जागतिक क्रमवारीत २४ व्या स्थानी असलेल्या अभयने जागतिक क्रमवारीत ५९ व्या स्थानी असलेल्या लेउंगचा ११-७, ६-११, ३-११, ११-५, १२-१० असा पराभव केला. त्याचे हे १३ वे पीएसए टूर विजेतेपद ठरले.
भारताची आज लढतताश्कंद : भारताची आज, सोमवारी २० वर्षांखालील गटाची आशिया कप पात्रता फेरीत सीरियाविरुद्ध लढत होणार आहे. या वयोगटातील अधिकृत स्पर्धांमध्ये भारतीय संघ सीरियाविरुद्ध आतापर्यंत केवळ दोनदाच आमनेसामने आला आहे. सन १९९६मध्ये भारताचा ०-१ असा, तर २००४मध्ये १-२ असा पराभव झाला होता. भारताच्या गटात उझबेकिस्तान आणि बांगलादेशचाही समावेश आहे. त्यामुळे भारतीय संघ विजयाने सुरुवात करण्यात उत्सुक आहे. मात्र, सीरिया संघ आव्हानात्मक आहे.
‘नवोदितांना संधी’
नवी दिल्ली : ‘आम्ही नवीन खेळाडूंना सातत्याने संधी देत आहोत. जास्तीत जास्त नव्या चेहऱ्यांना वाव दिला जात आहे. नुकत्याच झालेल्या श्रीलंकेविरुद्धच्या कसोटीतही मानव सुतार आणि सारांश जैन यांना खेळवण्यात आले. गुणवत्ता असेल, तर संघात नक्की स्थान मिळेल,’ अशी प्रतिक्रिया बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी व्यक्त केली. ते एका कार्यक्रमात बोलत होते.
‘इन्फँटिनो यांना विरोध’
ॲमस्टरडॅम : फिफा अध्यक्ष जियानी इन्फँटिनो यांच्यावर विश्वास राहिलेला नसल्याचे डच फुटबॉल फेडरेशन रविवारी स्पष्ट केले. यासोबतच ‘फिफा’च्या भविष्याबद्दल चर्चा करण्यासाठी आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्याचा प्रस्तावही त्यांनी दिला आहे. ‘फिफा’ला नवीन अध्यक्षांची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे. युरोपीय फुटबॉल महासंघाने इन्फँटिनो यांच्याविरोधात आघाडी उघडली आहे. त्यांच्यावर फुटबॉल वर्ल्ड कपच्या अपयशाचे खापर फोडले आहे. त्याला अनेक संघटनांचा पाठिंबा मिळत आहे.
मार्टिनेझ ‘चेल्सी’कडे
लंडन : चेल्सी फुटबॉल क्लबने अर्जेंटिनाचा गोलरक्षक एमिलियानो मार्टिनेझसह तीन वर्षांचा करार केला आहे. ३३ वर्षीय मार्टिनेझ ॲस्टन व्हिला क्लब सोडून लवकरच चेल्सी संघात दाखल होईल. झाबी अलोन्सो यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या चेल्सी संघात मार्टिनेझ आता मुख्य गोलरक्षक म्हणून जबाबदारी सांभाळेल. ॲस्टन व्हिलाने या महिन्याच्या सुरुवातीला ‘पार्मा’कडून जपानचा गोलरक्षक झिओन सुझुकीला संघात समाविष्ट केले होते. ज्यामुळे मार्टिनेझचा चेल्सीमधील प्रवेश सुकर झाला. मार्टिनेझ २०२१ पासून अर्जेंटिनाच्या राष्ट्रीय संघाचा नियमित गोलरक्षक असून, त्याने ६७ सामने खेळले आहेत.