भारताने आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेतील ॲथलेटिक्स मोहिमची सांगता २२ सुवर्णपदके पटकावून केली. भारताने एकूण तीस सुवर्णपदके पटकावली, त्यात सर्वाधिक वाटा ॲथलेटिक्समधील यशाचा आहे.
भारताच्या संदीप आणि हॅनी यांनी जागतिक विक्रमासह सुवर्णपदके जिंकली. मिझुहो पार्क अ ॅथलेटिक स्टेडियममध्ये झालेल्या पुरुषांच्या टी-६४ कॅटेगरीतील ४०० मी. शर्यतीत संदीपने ५२.२८ सेकंदांची वेळ नोंदवून जागतिक विक्रम प्रस्थापित केला आणि सुवर्णपदक पटकावले. तो सौदी अरेबियाच्या नूर अलसानाने ५३.१३ सेकंदांची वेळ नोंदवून रौप्य मिळवले. अजयकुमारने ब्राँझपदक मिळवले. ही गेम्स विक्रमाची वेळ होती. टी-६४मध्ये पायाने अपंग असलेले खेळाडू कौशल्य पणाला लावतात.हॅनीला सुवर्ण एफ ३७/३८ कॅटेगरीतील भाला फेकमध्ये हॅनीने ६०.४९ मीटरची कामगिरी नोंदवून जागतिक विक्रमासह सुवर्ण पटकावले. इराणच्या होर्मोज सेइदीकाझपुंजीने ५०.६८ मीटर कामगिरीसह रौप्यपदक मिळवले. यासह भारताने पदकांचे शतक साजरे केले.
प्रणवचे दुसरे सुवर्ण पुरुषांच्या एफ-५१ कॅटेगरीतील क्लब थ्रोमध्ये प्रणव सूरमाने सुवर्णपदक, तर धमरवीरने ब्राँझपदक मिळवले. प्रणवचे हे दुसरे सुवर्ण ठरले. प्रणवने थाळीफेकमध्येही सुवर्ण मिळवले होते. प्रणवने ३२.८७ मी. कामगिरीसह आपले सुवर्ण राखले. धरमवीरने २७.७१ मी. कामगिरी नोंदवली.
सुमीतचे यश पॅरालिम्पिकमधील विजेत्या सुमीत अंतिलने एफ ४२-४४/६१-६४ कॅटेगरीतील भाला फेकमध्ये सुवर्णपदक पटकावले. जगज्जेत्या सुमीतने ७२.४६ मीटर कामगिरी नोंदवली. २०२३च्या स्पर्धेहीत त्याने सुवर्ण मिळवले होते. महेंद्र गुर्जरने (५९.०३ मी.) रौप्य, तर संदीप सरगरने ब्राँझ मिळवले.