ठाणे : कळवा पूर्वेत पारसिक बोगद्याच्या बाजूला घराचा सज्जा व भिंत शुक्रवारी सकाळी कोसळली. या पडझडीत रहिवासी जखमी झाला आहे.
कळवा पूर्वेत वाघोबानगर भागात श्री सरस्वती हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजजवळ ही दुर्घटना घडली. घटनास्थळी महालक्ष्मी चाळीतील घराचा सज्जा व एक भिंत पडली. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अतिक्रमण विभागाचे कर्मचारी व आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी दाखल झाले. या पडझडीत घनश्याम राव (५०) यांच्या हाताला व पायाला दुखापत झाली असून, त्यांना कळवा छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले आहे.