Demand For Help For Injured Motorcycle Rider In Road Accident
जखमी चालक मदतीच्या प्रतीक्षेत
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
ठाणे : ठाण्यात धावत्या दुचाकीवर झाड कोसळून चालक गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी घडली. या पडझडीत जखमी झालेल्या चालकावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी शिवसेना नगरसेविका शीतल ढमाले यांनी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेऊन केली आहे.
वर्तकनगरनजीक कोरस रोड येथे रुणवाल प्लाझा टॉवरसमोर ही दुर्घटना घडली. टॉवरच्या आवारातील एक झाड पडल्याने दुचाकीस्वार महेश धुरी (४७) हे गंभीर जखमी झाले होते. नगरसेविका ढमाले यांनी धोकादायक वृक्षांची नियमित तपासणी करावी, या दुर्घटनेची चौकशी करावी व जखमी धुरी यांना नियमांनुसार भरपाई मिळावी, अशी मागणी केली आहे.